ब्रेकफास्ट न्यूज : पाकिस्तानवरील 'सर्जिकल स्ट्राईक' नाही तर 'फर्जिकल स्ट्राईक'- अरुण शौरी

Continues below advertisement

भाजप सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण शौरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानवर केलेला 'सर्जिकल स्ट्राईक' नाही तर 'फर्जिकल स्ट्राईक' आहे, अशी टीका शौरी यांनी मोदी सरकारवर केली आहे.


भारतीय सैन्य काम करतं आणि सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. फर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख भारतीय सैन्यासाठी केला नसून सरकारसाठी केला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही. सरकारची काश्मीर, चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर कोणतीही नीती नाही, असं शौरी म्हणाले.


दिल्लीमध्ये अरुण शौरी यांच्या हस्ते काँग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळी शौरी बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री जयराम रमेश, कुलदीप नायर उपस्थित होते. यापूर्वीही मोदी सरकारच्या आर्थिक नीतींवर अरुण शौरी यांनी हल्लाबोल केला होता. आता पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram