ब्रेकफास्ट न्यूज : स्विस बँकेतील सर्वच पैसा 'ब्लॅक मनी' नाही : अरुण जेटली
Continues below advertisement
स्विस बँकांमध्ये जमा असलेले सर्वच धन काळा पैसा नसल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलं आहे. स्विस बँकेत काल भारतीयांचा पैसा तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली, त्यानंतर जेटलींनी हे विधान केलं. विरोधी पक्षाकडून हा मुद्दा विनाकारण वाढवण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जेटलींनी आपली भूमिका मांडली.
Continues below advertisement