ब्रेकफास्ट न्यूज : 35 लाखांची लाच मागितली, केडीएमसीच्या उपायुक्तांना रंगेहाथ अटक
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त संजय घरत यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी 35 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 27 गावांमध्ये बेसुमार अनधिकृत बांधकामं उभी राहत आहेत. त्यावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे 42 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 35 लाख रुपये देण्याचं ठरलं.
कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातल्या घरत यांच्या दालनात आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास आठ लाख रुपयांचा पहिला हप्ता घरत यांनी स्वीकारला. यावेळी अँटी करप्शन ब्युरोने त्यांना रंगेहाथ अटक केली.