ब्रेकफास्ट न्यूज : खग्रास चंद्रगहणाचा योग आणि ब्लडमूनचं महत्त्व, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणांशी बातचीत

या शतकातील सर्वात जास्त कालावधीचे चंद्रग्रहणाचे आज आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. आज रात्री सुरु झालेलं हे ग्रहण २८ जुलैच्या पहाटेपर्यंत चालणार आहे. या ग्रहणकाळातली सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यादरम्य़ान चंद्र लालसर दिसणार असून त्याला ‘ब्लड मून’ चा अनुभव घेण्याची संधी खगोलशास्त्रज्ञांना मिळणार आहे.
दिल्ली, पुणे, मुंबई यासह अनेक शहरांतून हे चंद्रग्रहण दिसणार आहे. खग्रास अवस्थेत चंद्रबिंब पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येऊन झाकलं जाई. हे चंद्रग्रहण १०३ मिनिटे चालणार असून ते शतकातील सर्वात जास्त कालावधीचे चंद्रग्रहण आहे. पण या चंद्रग्रहणाचा आणि ब्लड मूनचा आनंद घेण्यासाठी आकाश निरभ्र असणं महत्त्वाचं आहे. नुसत्या डोळ्यांनीही चंद्रग्रहण पाहणे सुरक्षित आहे. त्यासाठी फिल्टर वापरण्याची गरज नाही असं तज्ज्ञांनी सांगितलंय. या संदर्भात आपण अधिक बातचीत करणार आहोत पंचागर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांच्याशी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola