ब्रेकफास्ट न्यूज : मान्सूनचं केरळात यावर्षी चार दिवस अगोदरच आगमन : स्कायमेट

Continues below advertisement
मुंबई : मान्सून 28 मे रोजी देवभूमी अर्थात केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे.

मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असा स्काटमेटचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. यंदाचा मान्सून 100 टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज 4 एप्रिल रोजी स्कायमेटने व्यक्त केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram