ब्रेकफास्ट न्यूज : मराठा क्रांती मोर्चाकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

Continues below advertisement
काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन अजून आक्रमक झालं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातले शहरं आणि तालुक्यांमध्ये हा बंद पुकारण्यात आला आहे. खबरदारी म्हणून आज मराठवाड्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. वारकऱ्यांचा परतीचा दिवस असल्यानं आंदोलकांनी एसटीवर दगडफेक करु नये, बंददरम्यान प्रवाश्यांना इजा होईल असं कोणतंही कृत्य करु नये, असं आवाहन मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आलं आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून औरंगाबाद ते पुणे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद नगर रस्ता काल दुपारपासून आंदोलकांनी बंद केलाय.  मुंबई पुणे महामार्गावरही जाळपोळ कऱण्यात आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram