ब्रेकफास्ट न्यूज : महिलांविरोधातील गुन्हेगारीत भाजप नेते आघाडीवर, एडीआर रिपोर्ट

Continues below advertisement
देशातील विद्यमान 48 खासदार आणि आमदारांनी महिलांविरोधात गुन्हे केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये अपहरण आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म अर्थात ADR च्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महिलांविरोधात गुन्हे करण्यात भाजपचे नेते सर्वात आघाडीवर आहेत. भाजपच्या 12 नेत्यांवर महिलांविरोधात गुन्हा केल्याचे गंभीर आरोप आहेत. या गुन्हेगार लोकप्रतिनिधींच्या यादीत सात नेत्यांसह शिवसेना पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सहा नेत्यांसह ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस अर्थात टीएमसी पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे.
यात लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा अशा तिन्ही सभागृहाच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram