ब्रेकफास्ट न्यूज : 2018 वर्षांतलं दुसरं सूर्यग्रहण संपलं

Continues below advertisement
2018 या वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण आज झालं. सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी सुरु झालेलं ग्रहण पावणेदहा वाजेपर्यंत राहिलं. हे ग्रहण साधारण 2 तास 25 मिनिटं हे ग्रहण सुरु होतं. भारतात मात्र हे ग्रहण दिसलं नाही. हे खंडग्रास सूर्यग्रहण होतं. या ग्रहणादरम्यान चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. त्यात सूर्य झाकोळला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार आजच्या ग्रहणाला विशेष महत्व आहे. आजच्या ग्रहणाचा परिणाम अनेक राशींवर होत असल्याचंही बोललं जातं. दरम्यान, आजचं ग्रहण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिकात दिसलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram