ब्रेकफास्ट न्यूज : भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : 46 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
Continues below advertisement
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवर भंडारा तालुक्यातील 34 गावं आणि तुमसर तालुक्यातील 12 गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या 34 गावातील ग्रामस्थांच्या गोसेखुर्द धरणात जमिनी गेल्या आहेत, मात्र त्यांचं आतापर्यंत पुनर्वसन झालेलं नाही. शिवाय इथल्या 12 गावांना बावंथडी प्रकल्पासाठी जागा देऊनही सिंचन उपलब्ध झालं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. परिणामी त्यांनी या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement