ब्रेकफास्ट न्यूज : मराठमोळ्या अक्षत मोहितेच्या कल्पक प्रकल्पाची 'नासा'कडून दखल
Continues below advertisement
'नासा'मध्ये मराठमोळा मुलगा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. अक्षत मोहिते असं त्याचं नाव आहे. अक्षतनं तयार केलेल्या स्पेस सेटलमेंट म्हणजेच अंतराळात राहण्याच्या प्रकल्पाची नोंद नॅशनल स्पेस सोसायटीनं घेतली आहे. त्यानं आपल्या प्रकल्पाला सॅक्झीमो हे नाव दिलंय. केवळ 10 दिवसात त्यानं हा प्रकल्प बनवला. जगभरातून निवड करण्यात आलेल्या या निवडीत भारतातून ४ तर महाराष्ट्रातून अक्षत मोहितेची निवड करण्यात आली आहे. अक्षतच्या प्रकल्पात एका वेळी अंतराळात २० हजार लोक राहू शकतात. त्यानं बनवलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण 24 ते 27 में रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्स इथं होणार आहे.
Continues below advertisement