ब्रेकफास्ट न्यूज : सुलेखनकार अच्युत पालव यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
पावसाळ्यात छत्री प्रत्येकाचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु बाजरात एकसारख्याच रंगांच्या छत्र्या उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या छत्रीची काही तरी वेगळी ओळख असावी असे आपल्याला वाटत असते. आपल्या छत्रीला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी सुलेखनकार अच्युत पालव यांनी काही वर्षांपूर्वी एक भन्नाट कल्पना शोधून काढली. आपली छत्री आपल्या मनाने रंगवण्याची आपल्या सुलेखनाच्या कलेचा वापर करत त्यांनी लोकांना दिलेलं हे नवं खाद्य प्रचंड सुपरहीट झालं. आजही त्यांच्या छत्री रंगवण्याच्या वर्कशॉपला तुडूंब गर्दी होते.
Continues below advertisement