ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | रशिया दौऱ्यानंतर रामदास पाध्येंसह अर्धवटरावांशी खास गप्पा

अर्धवटराव.. असं म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं.. अर्थात बोलका बाहुला आणि त्याला बोलतं करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर जादू केलेले अर्धवटराव त्यांच्या कुटुंबांसहित म्हणजेच रामदास पाध्ये आणि सत्यजित तांबे यांच्यासोबत रशियाच्या दौऱ्यावर जाऊन आलेत. आणि भाषेच्या बंधनापलिकडे जाऊन अर्धवटरावांनी तिथे सुद्धा सगळ्यांना आपलसं केलं.. निमित्त होतं वर्ल्ड पपेट्री कार्निवलचं. रशियाच्या येकाटीनबर्ग शहरात भरलेल्या या पपेट्री कार्निवलमध्ये आपल्या टायमिंगनं अर्धवटरावांनी तमाम भारतीयांचं प्रतिनिधित्व केलं.

खरतर अर्धवटरावांनी वयाची सेंच्युरी गाठली आहे. पण तरी ते एवढे टवटवीत दिसतात ते त्यांचे पालक रामदास पाध्ये यांच्यामुळेच.. अर्धवटरावांची अनोखी स्टाईल आहे.. आणि ती स्टाईल रामदास पाध्ये यांच्या प्रत्येक बाहुल्यांत दिसून येते. प्रत्येक बाहुल्याचं जणू व्यक्तीमत्वच वेगळं आहे असं आपण म्हणलो तरी चालेल.. आता भाषा, संस्कृती सगळं वेगळ्या असलेल्या रशियाच्या दौऱ्यातही रामदास पाध्ये यांनी भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola