ब्रेकफेस्ट न्यूज : नक्षलवाद्यांच्या कोणत्याही धमक्यांना सरकार घाबरत नाही - हंसराज अहिर
Continues below advertisement
माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीच तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांना याबाबत एक पत्र मिळालं असल्याचा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम 4 हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लान असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात आहे. यासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारीही दर्शवल्याची माहिती आहे.
सरकार खोटी कागदपत्रं तयार करुन एल्गार परिषदेच्या आयोजकांना यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला आहे.