ब्रेकफास्ट न्यूज : 'पिंपळ'निमित्त ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
काही कलाकार असे असतात ज्यांच्या अभिनयाचे संस्कार आपल्यावर झालेले असतात, असेच एक अभिनेते आपल्यासोबत आहेत. चौकट राजामधील नंदूचं नाव घेतल्यावर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, तर झपाटलेलामधील तात्या विंचू अंगावर काटा आणतो. पण त्यांनीच साकारलेले टिपरे आजोबा आपल्याला थेट आपल्या आजोळी घेऊन जातात. बोक्या सातबंडेमधून त्यांच्यातला मिश्किल लेखत दिसतो. तर मुन्नाभाई एमबीबीएसमधील महात्मा गांधी अचिंबित करतात.
आतापर्यंत तुम्हाला कळलच असेल आम्ही कोणत्या व्हर्सेटाईल, मिश्किल आणि सात्विक व्यक्तीमत्वाबद्दल बोलत आहोत. अर्थात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आज आपल्यासोबत आहेत. प्रायोगिक रंगभूमी, छबीलदास चळवळीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास अव्याहत रसिकांना त्यांच्यातील अभिनेत्याची ताकद आणि रेंज दाखवत आहे. आज गजेंद्र आहिरे दिग्दर्शित 'पिंपळ' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने दिलीप प्रभावळकर यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत.