Asian Yoga Competition Winner | आशियाई स्पोर्टस योगा स्पर्धेत सुवर्णपदक, श्रेया कंधारेच्या यशाचं गमक काय? | ABP Majha
दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई स्पोर्टस योगा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रेय़ा कंधारेनं सुवर्णपदकाला गवसणी घातलीये. १७ ते २१ वयोगटात तिनं आठ देशांतील अनेक योगापटूंना नमवून सुवर्णपदकावर नाव कोरलंय. श्रेया मुळची मुळशी तालुक्यातील कोंढवळे गावची. श्रेयाचे वडील शंकर कंधारे हे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊन श्रेया क्रिडाविश्वात आली. तिला आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
हा क्रीडा प्रकार नेमका कसा आहे आणि श्रेयानं हे यश नेमकं कसं मिळवलं हे आपण तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत. पुण्याहून श्रेया, तिचे वडिल शंकर कंधारे आणि तिचे प्रशिक्षकही आपल्यासोबत आहेत. श्रेया आपल्यासाठी खास प्रात्यक्षिकही करणार आहे. तिच्याशी संवाद साधणार आहे आमची सहकारी मानसी देशपांडे.....