ब्रेकफास्ट न्यूज : महागठबंधन म्हणजे तेल-पाण्याचं मिश्रण : नरेंद्र मोदी

चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना नरेंद्र मोदी यांनी ई-मेलद्वारे मुलाखती देण्याचा सपाटा लावलाय.
जागरण या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी महागठबंधन म्हणजे तेल आणि पाण्याचं मिश्रण आहे. ज्यातल्या पाण्याचाही काही उपयोग नाही, आणि तेलाचाही वापर करता येत नाही, अशी स्थिती असल्याचं म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली.
देशाला जातीवाद, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपेक्षा विकासावर जास्त विश्वास असल्याचंही मोदींनी म्हटलंय.
इतकंच नव्हे तर मोदींनी या मुलाखतीत देशातल्या 70 लाख तरुणांना रोजगार मिळाल्याचाही दावा केला आहे.
विशेष म्हणजे देशात आरक्षण, विकास, रोजगार आणि मॉब लिंचिंगवरुन सुरु असलेल्या चर्चेलाही मोदींनी उत्तर दिलंय.
दरम्यान ई-मेल द्वारे मुलाखत देणाऱ्या मोदींनी गेल्या 4 वर्षात एकही थेट पत्रकार परिषद घेतलेली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola