ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | एक्स्प्रेससाठी थांबण्याची आता गरज नाही, मध्य रेल्वेवर लोकल सुसाट धावणार

कल्याण ते ठाणे हा प्रवास अधिक जलद होणार आहे. कारण ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान फास्ट लोकल्ससाठी वेगळे ट्रॅक टाकण्याचं काम कालपासून सुरु झालंय. यासाठी कळवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान १० तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला होता. नव्या ट्रॅकमुळं फास्ट लोकलची वाहतूक स्वतंत्र होणार आहे.
सध्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान फास्ट आणि स्लो लोकल एकाच ट्रॅकवर धावतात. त्यामुळं अनेक लोकलचं वेळापत्रकही बदलावं लागतं. शिवाय एक्स्प्रेस गाड्या जाताना लोकलला थांबवावं लागतं. मात्र आता ठाणे ते दिवा दरम्यान अस्तित्वात असलेल्या चार ट्रॅक्ससोबत दोन अतिरिक्त रेल्वे ट्रॅक्स टाकण्यात येतायत. हे नवे ट्रॅक टाकल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा टळणार आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola