दूध दरात लीटरमागे पाच रुपये वाढ होण्याची शक्यता | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
गेल्या 50 दिवसांत प्रतिलिटर दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय न घेतल्यानं आता दूध उत्पादकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुधाचे दर एका लिटरमागे पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. अनुदान थकल्यामुळं उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक गुरवारी पुण्यात पार पडली. त्यात 58 सहकारी आणि खासगी डेअरीचे 76 प्रतिनिधी उपस्थित होते. जुलै महिन्यात सरकारच्यावतीनं लीटरमागे पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.