MHT CET Result 2019 | एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर | ABP Majha

Continues below advertisement
एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झालाय. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मध्यरात्रीपासून संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आज दिवसभर तुम्हाला हा निकाल पाहता येईल.
दरम्यान बारावी सायन्सच्या प्रक्टिकल्समध्ये मिळालेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश बोर्डाने दिले आहेत. याशिवाय ६५०० अर्जांचा येत्या 15 जूनपर्यंत रिचेकिंगचा निकालही लावण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल्समध्ये शुन्य ते एक असे गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, तसेच काहींना बारावीच्या लेखी परिक्षेतही अपेक्षेपेक्षा कमी गूण मिळालेत. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त प्रसारित केलं होतं. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात मंडळाला आदेश दिल्यानंतर पुनर्मुल्यांकन प्रक्रिया जलदगतीने पुर्ण केली जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram