ब्रेकफास्ट न्यूज : आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ, खगोलप्रेमींसाठी अनोखी संधी
एक खगोलशास्त्रीय दृष्ट्या दुर्मिळ घटना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. कारण आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असणार आहे. त्यामुळं तो सर्वांना पाहता येणार आहे. आज मंगळग्रह पृथ्वीपासून ५ कोटी ७५ लाख किलोमीटर अंतरावर असणार आहे. एरव्ही तो पृथ्वीपासून तब्बल ४० कोटी १० लाख किलोमीटरवर असतो. मात्र आता मंगळ जवळ आल्यानं निरभ्र आकाशात तो ठळकपणे पाहता येईल.