ब्रेकफास्ट न्यूज | कोल्हापूर | ओंकार शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षाला तीन जणांकडून मारहाण
गडहिंग्लज इथल्या ओंकार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजन जनार्दन पेडणेकर यांच्यावर कोल्हापुरात हल्ला करण्यात आला. तिघा हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरु आहे. राजन पेडणेकर हे कामानिमित्त बुधवारी कोल्हापुरात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास राजारामपुरीतून जनता बझार चौकाकडे चालत जात असताना तिघांनी त्यांना अडवले. पाठलाग करुन त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गडहिंग्लजमधील ओंकार शिक्षण संस्थेत गेले काही दिवस वाद सुरू आहे. त्यातून हा प्रकार झाला.