VIDEO | गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड | ब्रेकफास्ट न्यूज | कोल्हापूर | एबीपी माझा
कोल्हापुरात गोकुळ दूध संघावर आयकर विभागानं काल रात्री 10.30च्या सुमारास धाड टाकलीय. आयकर विभागनं तब्बल 4 तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी केली. दूध संघ फायद्यात असताना गोकुळने यावर्षी कमी प्राप्तीकराची रक्कम भरलीय, त्यामुळेच ही कारवाई करण्यात आलीय. गोकुळ दूध संघाने गेल्या महिन्यात 5 कोटींचा कर कमी भरल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याची माहिती मिळतीय. गोकुळवर पडलेल्या या धाडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे..