ब्रेकफास्ट न्यूज : जाहिरातींचा प्रवास मांडणारं 'जाहिरात चालिसा', सुनील धोपावकर यांच्याशी गप्पा

Continues below advertisement
छोटा पडदा असो वा मोठा.. कार्यक्रमात ब्रेक घेतला की जाहिरात येतेच.. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या लहानपणी पाहिलेल्या जाहिराती त्याच्या लिरिक्स सकट तोंडपाठ असतात.. हे यश असतं जाहिरातीचं लिखाण, दिग्दर्शन करणाऱ्याचं.. असाच जाहिरातीचा जुगाड करणारे सुनील धोपावकर, आज आपल्यासोबत ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आहेत.. जुगाड ही त्यांची संस्था आहे.

सुनील धोपावकर हे १९७८ पासून जाहिरात क्षेत्रात पारंगत आहेत. त्यांच्या कारकिर्दीला यावर्षी ४० वर्ष पूर्ण होत आहेत.. आणि त्यानिमित्तानं एक आगळवेगळं प्रदर्शन भरतंय जाहिरात चालीसा.. २६ मे ते २९ मे दरम्यान नाशिकमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

सुनील धोपावकर यांच्याबद्दल प्रामुख्यानं सांगायचं झालं तर टायपोग्राफी, कॅलिग्राफीपासून जाहिरातींच्या कॉपीराईट्सपर्यंत सर्व क्षेत्रात त्यांची मास्टरी आहे. एवढच नाही तर त्यांनी मराठीमध्ये ४० नवे फॉन्ट्स तयार केले आहेत. त्यांच्या या इंटरेस्टिंग प्रवासाविषयी थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram