ब्रेकफास्ट न्यूज : ठाण्यात 'हो रिक्षा', विनायक सुर्वे आणि मिलिंद बल्लाळ यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
रिक्षावाल्यांनी भाडं नाकारल्यानं अनेकदा प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं, पण ठाणे शहरात लवकरच 'हो रिक्षा' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाचणार असून रिक्षाचालकांचाही फायदा होणार आहे. दिवसभर एकही भाडं न नाकारणाऱ्या रिक्षाचालकांपैकी 5 रिक्षाचालकांना दररोज 150 रुपयांच्या किराणा खरेदीचे व्हाऊचर्स देण्यात येणार आहेत. ठाणे शहरातलं अग्रगण्य दैनिक ठाणे वैभव आणि अपना बाझार यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येणार असून 1 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते त्याची सुरुवात होणार आहे.
यासंदर्भात बोलण्यासाठी रिक्षा संघटनेचे विनायक सुर्वे आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ आपल्यासोबत आहेत
यासंदर्भात बोलण्यासाठी रिक्षा संघटनेचे विनायक सुर्वे आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ आपल्यासोबत आहेत
Continues below advertisement