VIDEO | बोलका मोबाईल कॅमेरा, फोटोग्राफर इंद्रजीत खांबेंसोबत खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

असं म्हणतात की हजार शब्दही जी भावना कदाचित व्यक्त करु शकणार नाहीत ती एका फोटोतून व्यक्त होते. त्यामुळे फोटोग्राफीचं माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम मानलं जातं. आणि या माध्यमावर आपलं वर्चस्व गाजवणारे फोटोग्राफर इंद्रजित खांबे आज आपले पाहुणे आहेत. त्यांच्याविषयीची खास गोष्ट म्हणजे या क्षेत्रातली प्रसिद्ध कंपनी अॅपलने त्यांच्यासोबत फोटोंसाठी करार केला असून होळीच्या निमित्तानं त्यांनी अॅपलसाठी केलेलं कामंही नुकतंच प्रदर्शित झालंय. इंद्रजित यांची होळीच्या रंगनिर्मितीवरची सिरीज अॅपलने सोशल मिडियावर प्रदर्शित केलीये. आणि अशी संधी मिळालेले ते भारतातले पहिलेच फोटोग्राफर आहेत.
इंद्रजित मूळचे कोकणातल्या कणकवलीचे. फोटो डॉक्युमेंट्री या प्रकारासाठी ते छायाचित्रं काढतात. मोबाईल फोटोग्राफीची त्यांना आधीपासून आवड. याचसंबंधीच्या एका स्पर्धेत विजेते म्हणून त्यांना अॅपलचा आयफोन मिळाला आणि त्यांनी फोटोज समाजमाध्यमांवर अपलोड करायला सुरुवात केली. यातूनच त्यांना अॅपलची संधी चालून आली.
इंद्रजीत यांनी काढलेले फोटो बघताक्षणीच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. त्य़ा फोटोंमधला मेसेज आपल्याला अंतर्मुख करतो. कोकणातील दशावतार, कोकणचं सौंदर्य, रोजच्या जीवनातले प्रसंग आणि तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत अनेक रंगीबेरंगी घटनांना त्यांनी कॅमेरात कैद केलंय.
आज ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारुया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola