ब्रेकफास्ट न्यूज : डीएसके प्रकरण : बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई पोलिसांच्या 'अंगलट'?

Continues below advertisement

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांनी केलेल्या गैरव्यवराहात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक केली. मात्र पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करताना घाई केल्याचं समोर आलं आहे. हीच घाई पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.


पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात ‘MPID’ कलमाखाली कारवाई केली. मात्र एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक होते. पण पोलिसांनी तसं काही केलं नाही. त्यामुळे या प्रकरणाता पोलिसांच्या समस्या वाढू शकतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram