कथक नृत्यांगना मनिषा साठे आणि परिवाराशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
कुठल्याही कलेमध्ये शास्त्रीय पाया असेल तर ती कला अधिक वृद्धिंगत होते. मग ती गायन असो, वादन वा नृत्य.. शास्त्रीय अभ्यास आणि त्याची साधना याशिवाय पारंगत होण्यासाठी दुसरा काही पर्याय नसतो. आणि मागील ५० वर्ष शास्त्रीय नृत्याची परंपरा जोपासून ती आता आपल्या तिसऱ्या पिढीच्या हाती सोपवणाऱ्या पंडिता मनिषा साठे या म्हणूनच वेगळ्या ठरतात. ज्या काळी स्त्रियांनी नृत्यप्रकार आपलासा करणं ही खूप मोठी गोष्ट होती, आणि त्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही वेगळा होता, त्या काळात पंडित गोपीकृष्ण यांच्याकडे शास्त्रीय नृत्याचे धडे मनिषा साठे यांनी गिरवले.
कथक नृत्यात अत्याधुनिक आणि विश्व संगिताचा त्यांनी वापर केला हेदेखील त्यांचं वैशिष्ट्य.. पण मनिषा साठे यांनी आता त्यांच्या पुढच्या २ पिढ्यांनाही या कलेमध्ये पारंगत केलं आहे. मनिषा साठे यांच्या कन्या, सून आणि नात अशा ३ पिढ्या आता रसिकांना एकत्र एकाच रंगमंचावर सादरीकरण करताना पाहाता येणार आहेत. त्यांचा नृत्यधारा या कार्यक्रमामधून कथकमधील ३ पिढ्या एकाच मंचावर येतील.. आणि त्यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत करायची आहे पुण्यातून..