ब्रेकफास्ट न्यूज | नवी दिल्ली | डागाळलेल्या नेत्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निर्णय

Continues below advertisement
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखण्याबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीपूर्वी आणखी एक ऐतिहासिक निर्णय देण्याची शक्यता आहे. ज्या राजकीय नेत्यांविरोधात आरोप निश्चिती झालेली आहे किंवा अशा आरोपांमध्ये पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे, अशा उमेदवारांना निवडणूक लढता येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनात्मक पीठाने याबाबतचा निकाल राखीव ठेवलेला आहे. याशिवाय राजकीय नेता असलेल्या व्यक्तीने वकिली करण्याविरोधातही याचिका करण्यात आली आहे. यावरही सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. घटनेनुसार, कोणत्याही आरोपीवर जोपर्यंत आरोप निश्चित होत नाहीत, तोपर्यंत त्याला दोषी ठरवलं जाऊ शकत नाही, असं यापूर्वीच केंद्र सरकारनं कोर्टात सांगितलंय. त्यामुळे कोर्ट आज काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram