ब्रेकफास्ट न्यूज | सोलापूर | शेतातला शेतकरी ते कांदबरी लेखक, पांडुरंग मोरे यांच्याशी खास गप्पा
मच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्ही आयुष्यातल्या कितीही अडचणींवर मात करु शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरचे पानगावचे शेतकरी पांडुरंग मोरे. पांडुरंग हे खरंतर हाडाचे शेतकरी. शेतात काम करता करता त्यांना कथा-कविता सुचतात आणि याच कथेच्या एकूण सहा कादंबऱ्या त्यांनी आजवर लिहल्या आहेत. पांडुरंग यांनी गेल्या पाच वर्षात दोन इंग्रजी कादंबऱ्या, तीन इंग्रजी नाटकं, दोन इंग्रजी कवितासंग्रह लिहले आहेत. त्यांची सध्याची प्रकाशित झालेली कादंबरी, किंगडम इन ड्रीम- दी प्राईम मिनिस्टर, ही सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
पांडुरंग यांच्यातल्या लेखकानं अनेकांना प्रेरणा दिली आहे.
बार्शी-सोलापूर रस्त्यावरचं पानगाव हे पांडुरंगच यांचं मूळ गाव...पानगावातच पांडुरंग यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. बार्शीत बीए पूर्ण केलं. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून एम एची पदवी घेतली. पाडुरंग यांनी आपलं संपूर्म लिखाण इंग्रजीतून केलेलं आहे. त्यांना बारावीला इंग्रजीत खरंतर फक्त ४५ मार्क होते. पानगावातला शेतकरी ते आंतराराष्ट्रीय पातळीवरचे लेखक हे झेप त्यांनी कशी घेतली हे त्यांच्याकडुनच जाणुन घेऊया