VIDEO | पैलवानांचे 'सांगाती', डॉ. सुजीत निलेगावकर आणि डॉ. शिरीष पाठक याच्यांशी बातचीत | ABP Majha
भारतामध्ये क्रिकेट सोडून इतर क्रिडा प्रकारांना म्हणावं तसं महत्व दिलं जात नाही.त्यात जर कुस्तीसारखे क्रिडा प्रकार असतील तर ही परिस्थिती अधिक गंभीर असते, कोणताही मल्ल अक्षरश जीव तोड मेहनत घेत सराव करत असतो, सामने खेळत असतो. अफाट शारिरीक मेहनतीमुळे अनेकदा त्यांच्या दुखापती गंभीर असतात. पण आर्थिक चणचणीमुळे त्या दुखापतींवर ठोस उपाय करणं प्रत्येक पैलवानाला परवडतंच असं नाही. तर आज आपण अशा पाहुण्यांना भेटणार आहोत ज्यांना आपण पैलवानांचे सांगाती म्हणू शकतो.
डॉ. सुजीत निलेगावकर आणि डॉ. शिरीष पाठक हे दोन डॉक्टर्स अतिशय कमी किमतीत पैलवानांच्या शारिरीक दुखापतींवर उपचार करतात. सांगाती सामाजिक संस्थेकडून अनेक महत्वाच्या आणि ऐरवी महागड्या शस्त्रक्रिया अगदी वाजवी किमतीत होतात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ५४ पैलवानांना अशा वाजवी उपचारांचा लाभ घेता आला आहे. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतल्या क्रिडाप्रकारासाठी वेगळ्या अर्थानं झटणाऱ्या या २ डॉक्टर्सशी आपण आज संवाद साधणार आहोत. डॉ. सुजीत निलेगावकर आणि डॉ. शिरीष पाठक पुण्यातून आपल्यासोबत आहेत.