ब्रेकफास्ट न्यूज | अकोला | आज दुसरी कापूस-सोयाबीन धान परिषद
अकोल्यात आज दुसरी कापूस-सोयाबीन धान परिषद होणार आहे.. माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप खासदार शत्रूघ्न सिन्हा, आपचे खासदार संजयसिंग, आमदार बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत.. दरम्यान, ही परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप आयोजक शेतकरी जागर मंचानं केलाय. रात्री नऊच्या सुमारास या परिषदेचे फलक काढण्याचा प्रकार समोर आलाय. पोलीसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलंय. याशिवाय सध्या अकोल्यात असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.