ब्रेकफास्ट न्यूज : एबीपी माझाचा 11 वर्षांचा प्रवास : मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
अकरा वर्षांपूर्वी सुरू झालेला एबीपी माझाचा हा प्रवास आज यशाची अनेक शिखरं गाठून आगामी काळात नव्या क्षितीजांना गवसणी घालायला सज्ज आहे. विविध विषयांचे आणि आशयांचे सर्वांना सामावून घेणारे कार्यक्रम हीच एबीपी माझाची मुख्य ओळख. गेली अकरा वर्ष आपल्या कामगिरीतलं सातत्य राखणं हे मोठं आव्हानं पेललेलं हे न्यूज चॅनेज. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या काही जाणत्या तर बऱ्याचशा नवख्या चेहऱ्यांना संधी देत २४ तास मराठी वृत्तवाहिनी सुरु करण्याचा हा धाडसी प्रयोग. आज वृत्तवाहिन्यांच्या जगात एक तप साजरं करण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.
सगळी मंडळी एका आश्वासक चेहऱ्याकडे बघून मराठीत पत्रकारितेला उतरली होती, तो चेहरा आहे एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचा. एबीपी माझाच्या या 11 वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलण्यासाठी स्वत: मुख्य संपादक राजीव खांडेकर आज ब्रेकफास्टन्यूजमधे आपल्यासोबत आहेत.