ब्रेकफास्ट न्यूज: काय आहे 'वन रुपी क्लिनीक' संकल्पना? डॉ. राहुल घुले यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
हल्लीच्या काळात आरोग्य सेवा अगदी वाजवी दरात मिळणं अवघड झालंय. आणि ज्या ठिकाणी अजूनही वाजवी दरात आरोग्यसेवा मिळत आहेत त्या बंद पाडण्याचा घाट खुद्द सरकारकडूनच घातला जातोय. कारण अवध्या एका रूपयात प्रवाशांना वैद्यकीय सेवा पुरवणारं वन रूपी क्लिनिक खरतर प्रवाशांसाठी खूप मोठा दिलासा होता. पण मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आलेली क्लिनिक बंद कऱण्याचा फतवा सरकारनं काढलाय. आणि त्याला कारण काय तर या क्लिनिक मध्ये MBBS डॉक्टर्सच नाहीत..
या क्लिनिकमुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांचा जीव वाचलाय. 4 वेळा तर या क्लिनिकमध्ये 4 बाळांचाही जन्म झालाय. इतकंच नाही तर खासगी रुग्णालयात हजारो रुपये घेऊन केल्या जाणाऱ्या चाचण्याही इथं अगदी किरकोळ दरात होतात. मात्र तरीही हे दवाखाने बंद करण्याचा फतवा रेल्वेनं काढल्यानंतर प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय.
या सगळ्यासंदर्भात बातचीत करण्यासाठी वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले आपल्यासोबत आहेत.