ब्रेकफास्ट न्यूज : एसटीच्या सत्तरीनिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी गप्पा

Continues below advertisement
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, सुख-दुःखाला धावणारी आणि आंदोलकांची पहिली टार्गेट असलेल्या, एसटीने सत्तरीत पदार्पण केलं आहे. 1 जून 1948 रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर पहिली एसटी बस धावली. या 70 वर्षाच्या प्रवासात एसटीने अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवले. सव्वा लाख कर्मचारी हा एसटीचा एक अविभाज्य भाग आहे. या 70 वर्षाच्या कालावधीत सरकार बदलले, तसे तसे एसटीचे रंग बदलत गेले.एसटीची रचनाही बदलत गेली.

डिझेल आणि विविध करांमुळे एसटीची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तुटपुंज्या पगारामुळे होणारे संप, कोर्टाच्या वाऱ्या अशा अनेक कारणांमुळे एसटी मेटाकुटीला आली आहे. काही संघटनाच्या आडमुठे धोरणामुळे ना एसटीचा विकास होतोय, ना एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा प्रश्न मार्गी लागत आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती दिल्या जातात, त्याचप्रमाणे आता एसटीदेखील ज्येष्ठ नागरिक झाल्याने एसटीला सरकारने विविध सवलत द्यायला हवी. जसे की, प्रवासी कर, इंधन कर, टोल टॅक्स, यातून एसटीला सवलत दिल्यास एसटीला आणखी भरभराटीचे दिवस येतील अशीच भावना आहे.

या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत परिवहन मंत्री दिवाकर रावते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram