ब्रेकफास्ट न्यूज : चिमुकली माऊंटेनिअर, सारपास ट्रेक पूर्ण करणाऱ्या उर्वी पाटीलशी गप्पा

Continues below advertisement
मूर्ती लहान पण किर्ती महान या वाक्याचा प्रत्यय आपल्याला उर्वी पाटीलकडे बघितल्यावर लगेचच येतो. उर्वी पाटीलने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हिमालयातील सारपास हा अत्यंत कठीम मानला जाणारा ट्रेक पार करत स्वतःसोबत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सरपास शिखर हिमालयात 13 हजार 800 फूट उंचीवर आहे. इथलं तापमान शून्याच्या खालीही 8 सेल्सिअस, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगवान वारे, अशा प्रतिकूल स्थितीत सारपासचा ट्रेक पूर्ण करणारी उर्वी ही सर्वात लहान वयाची महाराष्ट्रकन्या बनली आहे.
---------------------
उर्वीचे मूळ गाव कवठेमहांकाळमधील खरिशग. सध्या वडिलांच्या नोकरीनिमित्त तिचं वास्तव्य गोव्यात आहे. उर्वीच्या ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कॅम्पवरुन 4 मे 2018 रोजी झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे छोटे ट्रेक केले. पुढे 7 मे पासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. अत्यंत अवघड आणि प्रतिकूल परिस्थीत उर्वीने केलेल्या या कामगिरीबद्दल सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. या सगळ्या प्रवासावर बोलण्यासाठी स्वतः उर्वी पाटील आपल्यासोबत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram