ब्रेकफास्ट न्यूज : पुणे : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर खंडेरायाची यात्रा
आज सोमवती अमावस्थेसाठी जेजुरीमध्ये भंडाऱ्याची मुक्त उधळण होत आहे. येळकोट येळकोट, जय मल्हारच्या निनादात सोन्याची जेजुरी दुमदुमन निघाली आहे.सोमवती अमावस्येनिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जेजुरी गडावर दाखल झालेत. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सोहळ्याला सुरुवात झाली. त्यांनतर पालखीचं प्रस्थान कऱ्हा नदीकडे झालं.