बोरिवली : लोकलखाली आलेल्या महिलेचा जागीच मृत्यू

Continues below advertisement
मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे आणखी एक बळी गेला आहे. लोकल पकडताना हात सुटून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बोरिवली स्थानकावर घडली आहे. मयत महिलेचे नाव अलका पाठारे असं आहे. त्या एका खासगी बँकेत कामाला होत्या. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास विरार-चर्चेगट लोकल बोरिवली स्थानकात आल्यानंतर अलका पाठारे गाडी यांनी पकडली. मात्र, गर्दीमुळे हात सुटून त्या लोकलखाली पडल्या आणि तितक्यातच लोकल सुरु झाली. त्यामुळे लोकलच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गर्दीच्या वेळी लोकल प्रवास करताना सावधानता बाळगली पाहिजे असा अनेकदा सांगितलं जातं. मात्र या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने वारंवार अशा घटना घडतायेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram