VIDEO | मुंबईच्या 'बाजीराव'चा मृत्यू | मुंबई | एबीपी माझा
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पांढऱ्या वाघाचा वार्धक्यामुळे मृत्यू झालाय. हा पांढरा वाघ बाजीराव नावानं प्रसिद्ध होता. गेली 4 वर्ष बाजीराव संधीवात, स्नायुदुखीमुळे आजारी होता. गेल्या 10 दिवसांपासून त्याला चालताही येत नव्हते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या वाघाची कातडी जतन करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. यामुळे शवविच्छेदनानंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 2001 मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीपासून बाजीरावाचा जन्म झाला होता..