सांगली : ढोल-ताशाच्या गजरात वॉटरकप स्पर्धेचा शुभारंभ, बोरगावातील तरुणांकडून मध्यरात्री श्रमदान
Continues below advertisement
सांगलीत पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली. सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांनी यंदाही या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला. दुष्काळी भाग असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव देखील या स्पर्धेत सहभागी झालं. हातात टिकाव आणि खोरं घेत ढोल ताशाच्या तालावर बोरगावमधली मंडळी मध्यरात्रीच माळरानावर पोहोचली. आणि तुफान आलंया म्हणत कामाला सुरुवात केली. यावेळी पाणी फाऊंडेशनची टीम देखील हजर होती.
Continues below advertisement