मुंबई : प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असंही हायकोर्टानं सांगितलं आहे. प्लास्टिक ग्राहक, वितरक, उत्पादक सर्वांनी तीन महिन्यांमध्ये त्यांच्याजवळील प्लास्टिकचा साठा प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. भविष्याचा विचार केला तर पर्यावरणाचं संवर्धन महत्वाचं असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं. राज्यभरातील प्लास्टिक उत्पादक संघटना आणि वितरकांनी प्लास्टिक बंदीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीवेळी हायकोर्टानं प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा मोठं नुकसान होत असल्याचंही म्हटलं.