Bombay HC | पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भविष्यात मनुष्याला भयानक विकलांगता येऊ शकते - हायकोर्ट | ABP Majha
विविध विकासकामांसाठी जर सतत पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर येणाऱ्या भावी पिढीला याचे भयानक परिणाम भोगावे लागतील. कदाचित त्यांना शारिरीक अपंगत्वांनाही सामोरं जानं लागेल. अशी भिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यांनी व्यक्त केली. कोस्टल रोडला विरोध करणा-या याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिला. कदाचित येणाऱ्या पिढीला लांब बोटे, लांब नाक आणि मोठं डोक अशी काहीशी भयानक शरिरीत व्यंग भोगावी लागू शकतात. असं त्यांनी चक्क एका रेखाचित्राद्वारे कोर्टात दाखवले.