मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात अण्णा हजारेंना साक्षीदार करा, पत्नीची मागणी

Continues below advertisement
काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणात ज्य़ेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करण्यात यावं, अशी याचिका पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. राजकीय वैमनस्यातून 2006 साली काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटलांसह ७ जणांना अटक केली होती. मात्र पद्मसिंह पाटील सध्या जामिनावर बाहेर आहेत. याप्रकरणी अण्णा हजारेंची साक्ष महत्त्वाची असू शकते असं आनंदीदेवी यांचं म्हणणं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram