पालघर : बोईसर आगारातून एसटी बस पळवण्याचा माथेफिरुचा प्रयत्न
Continues below advertisement
बोईसर आगारातून एका माथेफिरुनं एसटी महामंडळाची बस पळवण्याचा प्रयत्न केला. माथेफिरूनं बस अचानक चालू केली. यावेळी बस सुदैवाने जवळच असलेल्या झाडाला धडकली. यानंतरच कोणीतरी बस पळवत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. घटनेनंतर संतप्त प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी माथेफिरुला पकडून बेदम चोप दिला. मात्र या घटनेतून एसटी महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. पुण्यातील संतोष माने प्रकरणाचा अनुभव असतानाही महामंडळाकडून अक्ष्यम्य हलगर्जी होताना दिसत आहे. दरम्यान पोलिसांकडून माथेफिरुला ताब्यात घेण्यात आलं.
Continues below advertisement