VIDEO | 83 वर्षांच्या वरळी सी फेसची रचना बदलणार | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
मुंबईच्या सौंदर्यातलं महत्वाचं ठिकाण असणाऱ्या वरळी सीफेसचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. कोस्टल रोडच्या कामासाठी लवकरच मुंबई महापालिका वरळी सी फेसचा पट्टा आपल्या ताब्यात घेणार आहे आणि 83 वर्षांच्या वरळी सी फेसची रचना बदलणार आहे. कोस्टल रोडच्या कामावेळी संपूर्ण सी फेस बंद करण्यात येणार नाही, तर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन टप्प्याटप्प्यानं वरळी सी फेसची कामं हाती घेणार आहे. लवकरच कोस्टल रोड आणि वरळी सी फेसला जोडणारा हरित पट्टा येथे बनवला जाईल. परंतु कोस्टल रोडसाठी वरळी सी फेसची रचना बदलण्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. आता कोस्टल रोडच्या कामासाठी समुद्रात भराव टाकण्याचं काम सुरु आहे.
Continues below advertisement