Blackbuck Poaching Case : गोरक्षेच्या नावाखाली माणसांना मारणाऱ्यांना शिक्षा का नाही? : जफर सरशेवाला
देशात हरणाची शिकार केल्यावर शिक्षा होते, पण गायीच्या नावावर माणसांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा होत नाही, असं म्हणत सलमान खानचे निकटवर्तीय जफर सरशेवाला यांनी अटकेप्रकरणी सवाल उपस्थित केले आहेत. जफर सरशेवाला हे सलमान खानच्या कुटुंबियांचे स्नेही आहेत. आज 6 वर्षांच्या तुरुंगवासाच्या न्यायालयाच्या आदेशानंतर ते एबीपी माझाशी बोलत होते.