Blackbuck poaching case: सलमानसोबत तुरुंगात काय काय झालं?
Continues below advertisement
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात अखेर बॉलिवुडचा दबंग सलमान खानला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आज जोधपूरच्या कोर्टात झालेल्या सुनावणीत सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं. पण शिकारीसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोपातून इतर 4 कलाकार आणि 2 प्रत्यक्षदर्शींची मात्र निर्दोष सुटका करण्यात आली. दरम्यान शिक्षेची सुनावणी होताच सलमानला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये धाडण्यात आलं आहे. दरम्यान, तुरुंगात रवानगी झाल्यानंतर सलमानबाबत काय काय घडलं आपण पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement