Black Buck Poaching case : सलमानला शिक्षेच्या सुनावणीनंतर बिष्णोई समाजाची मंदिरात पूजा
Continues below advertisement
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला ५ वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर बिष्णोई समाजाने आनंद साजरा केला. आणि समाजमंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा आणि हवन केलं. तसंच सलमान मुर्दाबादच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमला. तर काहिंनी फटाके फोडून सलमानच्या शिक्षेचं स्वागत केलं. कोर्टा बाहेर आणि सेंट्रल जेलबाहेरही मोठ्या प्रमाणात बिष्णोई समाजाचे लोक उपस्थित होते. बिष्णोई समाज हा प्राणी आणि वृक्ष पूजक आहे. काळवीटाची शिकार झाल्यानंतर याच समाजाने सलमान प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
Continues below advertisement