BJP Megabharti | भाजप प्रायव्हेट लिमिटेड नाही तर जनतेचा पक्ष, भाजपच्या मेगाभरतीवर सुधीर मनगंटीवार यांचं भाषण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव पिचड, अकोलेचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.