नवी दिल्ली : राहुल गांधीच्या 70 हजारांच्या जॅकेटवरुन नवा वाद, नवज्योतसिंग सिद्धूची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबाबत आता नवा वाद सुरु झालाय...मेघालय निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी तब्बल 70 हजारांचं जॅकेट घातल्याची माहिती समोर आलीये...शिलाँगमध्ये हे जॅकेट घालून राहुल गांधी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते...त्यामुळे भाजपनं राहुल गांधींवर जोरदार तोंडसुख घ्यायला सुरुवात केलीये...राहुल यांचं सुटाबुटातलं मेघालय सरकार भ्रष्टाचाराच्या आहारी गेल्याचं ट्वीट भाजपनं केलंय..काही दिवसांपूर्वी राहुल गांधी नोटबंदीच्या रांगेत उभे होते...तसंच त्यांनी काही महिन्यांपूर्वी सुटाचा फाटलेला खिसाही मीडियासमोर दाखवला होता...त्यामुळे आता भाजपनं टीका करण्याची आयती संधी साधलीये...दरम्यान काही महिन्यांपूर्वी मोदींच्या 10 लाखांच्या सूटावरुन मोठा वाद झाला होता...