Flood Help | भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, चंद्रकांत पाटलांच्या सूचना | ABP Majha

Continues below advertisement
भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. त्यांनी भाजपाच्या खासदार, आमदार, पालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. सर्व लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टी, आपदा कोष नावानं आपला धनादेश किंवा ड्राफ्ट द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी किमान शंभर रुपये पक्षाकडे जमा करावेत, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram